आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य; बँकेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगतिशील करण्याचा निर्धार,
बुलढाणा : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. गोविंदरावजी मिरगे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. या निवडीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली असून, बँकेच्या आगामी वाटचालीबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.
अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर बोलताना डॉ. शिंगणे यांनी ही निवड आपल्यासाठी केवळ एक पद किंवा जबाबदारी नसून, बँकेशी जोडलेल्या प्रत्येक सभासद, शेतकरी, ठेवीदार तसेच सहकार क्षेत्रातील बांधवांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती असल्याचे सांगितले.
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, युवक, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बँकेला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासोबतच तिच्या कामकाजात पारदर्शकता, आधुनिकता आणि प्रगतिशील दृष्टिकोन आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारी बँकिंग व्यवस्थेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ आर्थिक सुविधा मिळाव्यात, युवकांसाठी रोजगार व उद्योगाच्या संधींना आर्थिक पाठबळ मिळावे आणि सभासदांचा बँकेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी आगामी काळात ठोस प्रयत्न करण्याचा निर्धार डॉ. शिंगणे यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या निवडीबद्दल सर्व संचालक मंडळ, सभासद आणि सहकारी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या कारभाराला नवी दिशा मिळेल आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“सहकारातून समृद्धीकडे… विकासाच्या नव्या पर्वाकडे!” या संकल्पनेतून बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची आगामी वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


Post a Comment
0 Comments