Type Here to Get Search Results !

उकळी येथील ग्रामसभेला ग्रामपंचायत अधिकाऱ्यासहीत गावकर्यांचीही दांडी,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


ता. प्रतिनिधी : शिवाजी औदगे,

मेहकर: आज ग्रामपंचायत उकळी येथील ग्रामसभा आयोजित केली होती. गावात दवंडी देऊन सर्व गावकर्यांना सूचना सुद्धा दिली होती. मात्र ग्रामसभेला गावातील लोकांनी फार काही महत्व दिले नाही.ग्रामसभा असतांना ग्रामपंचायत अधिकारी गावात फिरकले सुद्धा नाही. महत्वाचे म्हणजे  ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष निवड करण्याचे ठरले होते.  गावकरी मंडळी व ग्रामपंचायत अधिकारी  ग्रामसभेला गैरहजर राहिल्यामुळे ग्रामसभा सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये  संपन्न झाली आहे. तसेच ग्रामसभेमध्ये घेतलेले ठराविक मुद्दे लवकरात लवकर मार्गी लावले जातील. असे सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले.यांच्या उपस्थितीमध्ये पारित झालेले ठरावाप्रमाणे कामे लवकरात लवकर पूर्ण करतील. असे लेखी त्यांनी आश्वासन दिले आहे.परंतु ग्रामसभा जाहीर करून, दवंडी देऊनही ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभेला हजर न राहणे म्हणजे याला काय म्हणावे ? असा प्रश्न हजर असलेल्या गावकर्यांना पडलेला आहे.ग्रामसभेला हजर नसणे हा लोकशाहचा भंग नाही का?  का ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कारवाई होऊ नये ?


प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्या गैरहजर ग्रामपंचायत अधिकाऱ्याची चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.



ग्रामसभा का महत्वाची,

ग्रामसभा हा भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा आणि तळागाळातील लोकशाहीचा मुख्य पाया व कणा आहे.ग्रामसभेचे महत्त्व आणि वैशिष्ट्येग्रामसभेचे महत्त्व खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते:थेट लोकशाही: ग्रामसभा हे थेट लोकशाहीचे प्रतीक आहे, जिथे लोकप्रतिनिधींशिवाय नागरिक स्वतः एकत्र येऊन निर्णय घेतात.समान अधिकार: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेला प्रत्येक नोंदणीकृत मतदार आपोआप ग्रामसभेचा सदस्य बनतो. यात जात, धर्म किंवा लिंगाचा भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार असतो.पारदर्शकता आणि उत्तरदायित्व: ग्रामपंचायतीच्या कामांवर, खर्चावर आणि निर्णयांवर देखरेख ठेवण्याचे काम ग्रामसभा करते, ज्यामुळे कारभारात पारदर्शकता येते.विकास योजनांची मंजुरी: गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारे बजेट, योजना आणि कामांना ग्रामसभेमध्ये मंजुरी दिली जाते.स्थानिक समस्यांचे निवारण: गावातील अडीअडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामसभेत खुला संवाद साधला जातो.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad