Type Here to Get Search Results !

३२०० कोटींचा रस्ता मंजूर होताच ५० अधिकाऱ्यांनी तिथेच जमीन घेतली, १० महिन्यात ११ पट किंमत वाढली


आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक -

भोपाळ :- ही बातमी भोपाळची आहे, मात्र देशभरात सर्रास हेच सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना रोड कुठून जाणार ? त्यासाठी कोणत्या जमिनी संपादीत होणार हे आधीच माहित असतं. त्यामुळे अधिकाऱ्यांची ही लॉबी एकत्र येऊन जिथून रस्ता जाणार, जिथे जमिनी संपादीत होणार तिथल्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी करायच्या आणि कोट्यावधी रुपयांचा मावेजा हडप करायचा, असाच प्रकार सर्वत्र सुरु आहे. एकट्या पाठक सारखे अधिकारी यामध्ये सापडतात, मात्र बाकीचे अधिकारी मालामा होतात ही वस्तुस्थिती आहे. भोपाळमधील हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या खरेदीमध्ये केवळ मध्यप्रदेशमधीलच नव्हे तर महाराष्ट्रातील काही मोठ्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आता या ५० अधिकाऱ्यांनाही उचलून आत टाकायला हवे.


पाठक नंतर आता बाकीचे अधिकारीही पकडा,

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना भूसंपादन घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये एकटे पाठकच नाही तर खालचेही अनेक अधिकारी आहेत त्यांना का पकडले जात नाही. जसे पाठकला पकडले तसे इतर अधिकाऱ्यांनाही पकडणे आवश्यक आहे. पाठक यांच्या अटकेसाठी वरुन सुत्रे हलली, यामध्ये वाल्मीक कराड आणि अविनाश पाठक यांच्यातील संबंध देखील कारणीभूत असू शकतात. कराडनेच पाठक यांना बीडमध्ये आणले होते, अशीही माहिती आता समोर येत आहे. असे असले तरी पाठक प्रमाणेच घोटाळा करणारे इतरही अधिकारी गजाआड झाले पाहिजेत.


५० आयएएस/आयपीएसअधिकाऱ्यांनी एकाच दिवशी घेतल्या जमिनी,

मध्य प्रदेशातील आयएएस अधिकाऱ्यांच्या अचल संपत्ती विवरण (IPR) तपासात कोलार परिसरातील गुराडी घाट गावातील मोठ्या जमीन गुंतवणुकीचा खुलासा झाला आहे. देशभरातील सुमारे ५० आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांनी एकाच दिवशी येथील कृषी जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.


तब्बल ११ पटीने भावात वाढ,

 या व्यवहारात केवळ मध्य प्रदेश कॅडरचेच नव्हे तर महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा कॅडर तसेच दिल्लीतील वरिष्ठ अधिकारीही सहभागी होते. विशेष म्हणजे जमीन खरेदीनंतर अवघ्या १६ महिन्यांतच या परिसरातून जाणाऱ्या तब्बल ३२०० कोटी रुपयांच्या वेस्टर्न बायपास प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर केवळ १० महिन्यांत या जमिनीचा लँड यूज बदलून ती निवासी क्षेत्रात रूपांतरित करण्यात आली. त्यामुळे जमिनीच्या किमतीत तब्बल ११ पट वाढ झाल्याचे समोर आले आहे.


फंदा,

सीहोर की ओर,

35 किमी का पश्चिमी बायपास,

भोपाल

'यूनावट'

गुराड़ी घाट: यहां पर है अधिकारियों की जमीन है,

रतनपुर सड़क,

श्रमात राड,

एकाच दिवशी २.० २३ हेक्टर जमीन खरेदी ४ एप्रिल २०२२ रोजी २.०२३ हेक्टर कृषी जमिनीची नोंदणी एका दस्तऐवजात करण्यात आली. या व्यवहारात ५० जणांनी संयुक्तरीत्या जमीन खरेदी केली होती. दस्तऐवजानुसार या जमिनीची किंमत ५.५ कोटी रुपये दाखवण्यात आली असून बाजारमूल्य ७.७८ कोटी रुपये नमूद करण्यात आले होते. IPR मध्ये ही मालमत्ता "like-minded officers" म्हणजे समान विचारसरणी किंवा उद्देश असलेल्या अधिकाऱ्यांनी खरेदी केली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad