Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

बळीराजानं लहान लेकरासारखं सांभाळलेल पिक पावसावाचून तहानलं,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


जिल्हा प्रतिनिधी : समाधान राठोड,

बुलढाणा: गेल्या ४० दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील लोणार व सिंदखेराजा परिसरात शेतकऱ्यांची उभी पिके होरपळून चाललेली आहे.तसेच संपूर्ण जिल्ह्यातील एकूण परिस्थिती पाहता सुरुवातीपासून पुरेसा पाऊस न झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर यासारखी पिके तर वाळतच आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या विहिरीला सुद्धा पाणी आले नाही.खरीप पिके तर चाललीच परंतु रब्बी पिके कशी येणार. शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याचे संकेत दिसत आहेत.


                                पावसाभावी सुकत चाललेले सोयाबीन पीक


 गेल्या वर्षी अतीवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उध्वस्त झाली होती. आणि याहीवर्षी पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके उध्वस्त होतांना दिसत आहेत.सतत दोन वर्षापासून शेतकऱ्याला कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे  शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तरी शासनाने दुष्काळ भागाची पाहणी करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाययोजना करून लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी १,०००००/- रुपये नुकसान भरपाई द्यावी. शेतकरी हिताच्या उपाय योजना राबवाव्यात. अशी जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad