आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
तालुका प्रतिनिधी - शिवाजी औदगे,
मेहकर : मेहकर तालुक्याच्या हद्दीमध्ये उकळी गावालगत साखरकारखाना येत असून सदरच्या कारखान्यामध्ये मुरूम व डब्बर काढून विक्री करण्याचे काम विनपरवानगी चालू आहे. आणि डब्बर काढण्याकरिता ब्लास्ट करणे चालू असते त्या ब्लास्टिंगमुळे रोडने येणाऱ्या -जाणाऱ्या गाडयांना,शेजारी असलेल्या कलाकृती केंद्रवाल्यांना धोका निर्माण झालेला आहे.
सदर प्रकरणी उकळी येथील तक्रारकर्ता अमोल श्रीकिसन बोरे यांनी मेहकर येथील मा.तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन मागणी केली आहे की,त्वरित स्थळ पंचनामा करून जेसीबी, पोकलँड, ट्रॅक्टर व इतर वाहनांवर आणि वाहन मालकांवर,ड्राइव्हरसहित सरकारी मालमत्ता उत्तखलन कायद्यानुसार पोलीस कार्यवाही सोबत योग्य ती कार्यवाही करावी व योग्य ती शिक्षा व्हावी. असे अमोल बोरे यांनी मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments