आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -देविदास वायाळ पाटील,
नागपूर : मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा नियोजन भवन, नागपूर येथे आज विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर आढावा बैठक घेतली. यामध्ये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जलसंपदा विभाग, नागपूर महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, नगरपंचायत बिडगाव, कामगार विभाग तसेच काटोल-नरखेड तालुक्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरण आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्धतेबाबत संबंधित अधिकारी व खाजगी बँकांच्या प्रतिनिधींशी सखोल चर्चा करण्यात आली.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अधिकाऱ्यांनी नियमित दौरे करून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व आवश्यक नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना दिल्या.
नागपूर शहर आणि जिल्ह्यातील वाढते प्रदूषण लक्षात घेता, पुढील २० वर्षांचा विचार करून ‘प्रदूषणमुक्त नागपूर’ घडविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित संस्थांच्या समन्वयातून दीर्घकालीन आणि एकात्मिक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
तसेच काटोल-नरखेड आणि जिल्ह्याच्या शेवटच्या भागांमध्ये आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी एकात्मिक योजना तयार करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला. शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभ पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच याबाबत टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना व बँक प्रतिनिधींना दिल्या.या शिवाय कामगार, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंपदा आणि नागरिकांशी संबंधित विविध प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
यावेळी मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत खा. श्यामकुमार बर्वे, जी,आ. चरणसिंग ठाकूरजी, माजी आ. सुधाकर कोहळेजी, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहा. आयुक्त सचिन ढोले, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments