राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -देविदास वायाळ पाटील,
या वर्षी २०२६ ला घेण्यात आलेली नीट परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली आहे.३ मे रोजी नीट ची परीक्षा पार पडली होती. पण पेपरफुटीमुळे (NTA) म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे आता, या पेपरफुटीचं कनेक्शन नाशिकमधून समोर आलं आहे. नीट परीक्षेचा पहिला पेपर हा नाशिकमध्ये फुटला असून, येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात 30 वर्षीय शुभम खैरनार या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. हा आरोपी जिल्ह्यातील नांदगावातील आहे. या सर्व प्रकरणावर शुभमच्या डॉक्टर वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शुभम खैरनारचे वडील काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य घडविण्यासाठी महत्वाची असलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली. यामध्ये नीट चा पेपर लीक झाल्यानं ही परीक्षा रद्द झाली असून यामध्ये नांदगाव येथील शुभम खैरनार याला याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं जबाबदार धरत ताब्यात घेतलं आहे. आता सिबीआय चे पथक नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक गुन्हे शाखा २ च्या कार्यालयात सिबीआय च
पथक शुभम खैरनारला ताब्यात घेण्यासाठी दाखल झालं आहे. दरम्यान, आता शुभमचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून याप्रकरणी 'आमचा मुलगा निर्दोष आहे. गेल्या सहा महिन्यापासून तो नाशिकमध्ये BAMS ची प्रॅक्टीस करत आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध नसणार आहे. जरी त्याचं या प्रकरणात नाव येत असेल तर त्याची चौकशी व्हावी', असं शुभम खैरनार याचे वडील डॉ.मधुकर खैरनार यांनी म्हटलं आहे.
मुख्य सूत्रधार शोधून कारवाई करा'
'नीट परीक्षेसाठी सामान्य विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. मात्र, २०२४ ला नीटचा पेपर फुटल्याचा आपण सर्वांनी पाहिला. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात SRPFचा पेपर फुटल्याचा देखील आपण पाहिलं, आणि आता यावर्षीसुद्धा पेपरमध्ये जसेच्या तसे प्रश्न येतात. मग याच्यामागे मलिदा कोण खात आहे? यामागे पैसा कोण घेत आहे? हा जो भ्रष्टाचार आहे तो सामान्य मुला-मुलींच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे. आज परीक्षा रद्द झाली. मात्र, या मागचा सूत्रधार शोधण्याची गरज आहे आणि कडक कारवाई व्हावी. अन्यथा हेच विद्यार्थी सरकारला लोकशाही पद्धतीने उत्तर देतील', अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली आहे.

Post a Comment
0 Comments