Type Here to Get Search Results !

इयत्ता ९ वी व १० विची एकत्रित पटसंख्या 20 असली तरीही 3 शिक्षक पदे मंजूर होणार

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


संचमान्यतेचे निकष शिथिल - इयत्ता ९ वी व १० वि ची एकत्रित पटसंख्या 20 असली तरीही 3 शिक्षक पदे मंजूर होणार,

मुख्यसंपादक -देविदास वायाळ पाटील,

   अमरावती : शैक्षणिक सत्र २०२६-२७  मध्ये ग्रामीण भागातील शाळांना विद्यार्थी पटसंख्येबाबत विशेष सवलत मिळणार असुन इयत्ता ९ वी व १० वी ची एकत्रित पटसंख्या २० किंवा त्यापेक्षा अधिक असली तरीही शाळांना ३ शिक्षक पदे मंजूर होणार आहेत.याबाबत डॉ. सौ. संगीताताई शिंदे (बोंडे ) यांनी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर साहेब व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांचे विशेष आभार मानले आहेत. सदर सवलत ही शासननिर्णय दि.१५ मार्च २०२४ नुसार २०२५-२६  ची संच मान्यता करतांना मिळणार आहे. 


डॉ. सौ. संगीता शिंदे बोन्डे यांनी केला होता प्रश्न उपस्तित,

 शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर साहेब यांच्या दालनात दि. २९ एप्रिल रोजी राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नाबाबत आयोजित बैठकीत डॉ. सौ.संगीताताई शिंदे (बोंडे )यांनी 2026-27 च्या संचमान्यतेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या बैठकीस कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब,भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रशमजी कोल्हे, प्रदेश सहसंयोजक श्री.पदमाकर घोगरे, सिनेट सदस्य तथा अमरावती विभाग सहसंयोजक श्री. अमोल ठाकरे, संस्थाध्यक्ष श्री. शुभम वानखडे, श्री. रणजीत पावडे, सुकाणू समिती सदस्य श्री.रमेशजी देशपांडे,प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, उपसचिव, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


दिलेला शब्द पाळला,

 शिक्षण राज्यमंत्री पंकजजी भोयर साहेब यांनी बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी दिलेला शब्द पाळला असुन महाराष्ट्र शासनाचे शिक्षण उपसचिव यांनी यांनी याबाबतचे पत्रही निर्गमित केले आहे.याबाबत डॉ. सौ.संगीताताई शिंदे (बोंडे ) यांनी शिक्षण राज्यमंत्री पंकजजी भोयर साहेब यांचे विशेष आभार मानले आहेत.


ग्रामीण भागातील शाळांना शैक्षणिक सत्र 2026-27 करीता मिळणार विशेष सवलत"


डॉ.सौ.संगीताताई शिंदे (बोंडे ) यांच्या प्रयत्नांना यश- शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर साहेब यांचे विशेष आभार- दिलेला शब्द पाळला.




Post a Comment

0 Comments

Top Post Ad