Type Here to Get Search Results !

पदवीधर वेतनश्रेणी बाबत नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net




मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील,

पदवीधर वेतनश्रेणी बाबत नागपूर उच्च न्यायालय खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल लागला आहे.सर्व जि.प. पदवीधर / विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करा.. कोर्टाचे आदेश.. राज्यातील हजारों शिक्षकांना न्याय मिळाला.


राज्य सरकारचा १/३ चा भेदभावपूर्ण कोर्टाकडून रद्द.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विषय / पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी न देता त्यापैकी मंजूर पदवीधर पदांच्या केवळ एक तृतीयांश शिक्षकांनाच पदवीधर वेतनश्रेणी देणे बाबत १३/१०/२०२६  चा शासन निर्णय होता, त्यामुळे इयत्ता ६ वी ते ८ वी च्या पदांवर काम करून देखील हजारों पदवीधर विषय शिक्षकांना उपशिक्षक पदाचीच वेतनश्रेणी दिली जात होती, व ज्यामुळे शिक्षकांचे हजारों रुपयांचे आर्थिक नुकसान दरमाह होत होते, त्यामुळे या असमानते विरुद्ध व या भेदभावा विरोधात *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना बुलढाणा जिल्हा टीम द्वारे दि. 29/11/2022 याचिका क्रं.7966* ला नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर आता 08 /5/2026 रोजी निकाल आला असून माननीय कोर्टाने शिक्षकांच्या बाजूने निकाल देत राज्य सरकार च्या 2016 शासन निर्णयातील 1/3 अट रद्द ठरवली आहे.. व सरसकट सर्व पदवीधर / विषय शिक्षकांना त्यांच्या 6 वी ते 8 वी वरील नियुक्ती तारखेपासून पदवीधर वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले आहेत..


पात्र शिक्षकांना वेतनश्रेणी लागू,

तसेच जे विषय शिक्षक ज्यांनी नंतर शैक्षणिक पात्रता धारण केली त्यांना ती पात्रता उत्तीर्ण केल्याच्या तारखेपासून वेतनश्रेणी लागू करण्याचे स्पष्ट केले आहे.. (उदा- जे 12 वी विज्ञान झाले परंतु B. Sc नसलेले शिक्षक विज्ञान पदवीधर / विषय शिक्षक म्हणून नियुक्त केले गेले होते त्यांना त्यांच्या B Sc उत्तीर्ण तारखेपासून वेतनश्रेणी मिळेल.)त्यासोबतच पदवीधर विषय शिक्षक नियुक्ती पासून ते आज अखेर चा वेतन फरक ही देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे..


सदर निर्णय हा माननीय उच्च न्यायालयाचा असल्याने समान न्याय तत्वाने तो सर्व जिल्ह्यातील विषय शिक्षकांना लागू होतो.


धन्यवाद! पुनःश्च एकदा या ऐतिहासिक निकालासाठी सर्व पदवीधर शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Post a Comment

0 Comments

Top Post Ad