आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -देविदास वायाळ पाटील,
पापरी (ता. मोहोळ) येथील महिला शेतकरी शोभा बाबूराव डोंगरे (वय ३५) यांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (ता. १०) दुपारी ही घटना घडली असून, मोहोळ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांतील उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरे कुटुंबीयांनी आपल्या शेतात गुलछडी फुलांची लागवड केली आहे. दररोजप्रमाणे रविवारी सकाळी शोभा डोंगरे या फुले तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या. व्यापाऱ्यांना वेळेत फुले देण्यासाठी त्यांनी कडक उन्हात दुपारपर्यंत काम सुरू ठेवले. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती बाबूराव डोंगरे शेतात आले. उन्हाच्या तीव्रतेमुळे तहान लागल्याने शोभा यांनी पाणी प्यायले. मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने बाबूराव डोंगरे यांनी त्यांना तातडीने पेनूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सुसज्ज रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र पुढील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Post a Comment
0 Comments