Type Here to Get Search Results !

हृदयद्रावक घटना;आधी तीन वेळा विहीर कोसळली,आता चौथ्यांदा कोसळून तिघांचा मृत्यू,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net




मुख्यसंपादक -

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शेतीला पाणी मिळावे आणि उत्पन्न वाढावे या आशेने शेतकरी बाजीराव काकडे यांनी शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू केले होते. मात्र गेल्या काही महिन्यांत ही विहीर तब्बल तीन वेळा कोसळली होती.अनेक अडचणी, आर्थिक नुकसान आणि संकटांचा सामना करत काकडे कुटुंबाने हार मानली नाही. विहीर मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांधकामही करण्यात आले होते. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते.




शनिवारी रात्री विहिरीतील मोटार सुरू नसल्यामुळे बाजीराव काकडे विहिरीत उतरले. त्यांच्यासोबत मदतीसाठी दोन्ही मुलगेही खाली गेले. याचवेळी अचानक विहिरीचा कडा कोसळला आणि तिघेही मातीखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत बाप आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.“अर्ध्या तासात येतो” असे सांगून घरातून गेलेले तिघे परतलेच नाहीत. मोबाईल बंद येत असल्यामुळे कुटुंबियांनी विहिरीकडे धाव घेतली आणि पोहचले असता समोर भयावह दृश्य विहीर कोसळलेली पाहताच संपूर्ण गाव हादरून गेले.दोन भाऊ आणि वडील गेले, परिसरात  या घटनेमुळे संपूर्ण सिल्लोड तालुक्यात शोककळा पसरली असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंत्यसंस्कारावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad