Type Here to Get Search Results !

चुलत भावाशी अनैतिक संबंध,रचित हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


शिवानीची बॉडी धडापासून वेगळी; मृतदेह जाळला,

जिल्हा प्रतिनिधी - समाधान राठोड,

Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात उघडकीस आली आहे. एका 20 ते 25 वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शीर धडावेगळे केलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलासमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. प्राथमिक तपासात हा मृतदेह कोणाचा आहे? या हत्येमागे कोणाचा हात आहे? याबाबत कोणतेही धागेदोरे मिळत नव्हते. मात्र, पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावला असून, यात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोटच्या मुलीचा खून खुद्द तिच्या पित्यानेच मुलाच्या मदतीने केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले असून समाजात एकच खळबळ उडाली आहे.




वडिलांनीच रचला कट,

या घटनेचा सविस्तर तपास केला असता असे समोर आले की, मृत तरुणीचे नाव शिवानी बापुराम कळमेकर असून ती मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खडकनार येथील रहिवासी होती. शिवानीचा विवाह काही दिवसांपूर्वीच म्हणजे 15 एप्रिल 2026 रोजी पार पडला होता. लग्नानंतर ती सासरी गेली खरी, पण तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या वडिलांनी या हत्येचा कट रचला. शिवानीचे तिच्याच गावातील चुलत भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय तिचे वडील बापुराम नथ्थु कळमेकर यांना होता. याच संशयाचे पर्यवसान एका भीषण हत्याकांडात झाले. आपल्या कुटुंबाची अब्रू गेल्याच्या भावनेतून बापाने स्वतःच्या हाताने मुलीचा जीव घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी आपल्या मुलाची साथ घेतली


संशय आणि नियोजित हत्याकांड,

हत्येच्या रात्रीचा थरार अत्यंत भयानक होता. 23 एप्रिल रोजी रात्री वडिलांनी शिवानीच्या डोक्यात बांबूने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी बापाने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एक दिवस घरातच लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 एप्रिल रोजी त्याने आपला मुलगा अजय बापुराम कळमेकर याच्या मदतीने हा मृतदेह मोटारसायकलवर टाकून महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील राजुरा शिवारात आणला. तिथे मुलीची ओळख पटू नये आणि पोलिसांची दिशाभूल व्हावी या उद्देशाने त्यांनी तिचे शीर धडावेगळे केले आणि मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी हत्येसाठी वापरलेले साहित्य आणि रक्ताने माखलेले कपडे जंगलात फेकून दिले जेणेकरून कोणत्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad