आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
ता.प्रीतिनिधी: शिवाजी औदगे,
मेहकर: सुकळी गावातील प्रतिष्ठित शिक्षक श्री विनोद मारोतराव नवले सर यांची सुकन्या कु जान्हवी निर्मला विनोद नवले ही मुळातच अतिशय हुशार,संयमी मुलगी आहे. त्यातच तिने कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यास करत यशाचे शिखर गाठले.त्यामुळे तिच्यावर गावात व सर्वत्र पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
कुमारी जान्हवी हीने नर्सरी पासून ते वर्ग 8 वी पर्यत A श्रेणी तर वर्ग 9 ते 10 वी मध्ये 96% गुण मिळवून नावलौकिक मिळविले,पुढे यशाचा आलेख चढतच गेला आणी तिने मागे वळून कधी पाहीलेच नाही.वर्ग 12वी मध्ये प्रावीण्य मिळवून पुण्यात PCCOER सारख्या नामांकित कॉलेज ला ईंजिनियरींग ला प्रवेश मिळवून तिथेही आपल्या सातत्यपूर्ण, कठोर परिश्रम करत 9,07 (SGP) मिळवून मिलेनियम ईंजिनियरींग पुणे येथे उच्च पदावर नोकरी सुधा मिळविली. त्यामुळेच तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. तिलातिच्या यशाचे श्रेयाबद्दल विचारले असता आपले आईवडील व गुरूजन यांचे मार्गदर्शन आणि आपले सातत्यपूर्ण कठोर परिश्रम यामुळेच यश मिळाले असे सांगत असून अजूनही प्रशासकिय सेवेत चांगले पद मिळवीण्याची अपेक्षा तिने मनातून बोलून दखवली आहे.
इतर मुलींनीही जान्हवी सारखे यश संपादन करत यशाचे शिखर गाठण्याचा मनात अट्टाहास धरावा. आणि कठोरात कठोर प्रयत्न करून मोठ्या पदावर कसे जाता येईल ही इच्छा बाळगून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा.


Post a Comment
0 Comments