आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :देविदास पाटील वायाळ,
पुणे : राज्यातील जास्त थकीत रक्कम असलेल्या पीक कर्जदार शेतकऱ्यांना आधी दोन लाखावरील थकीत रकमेची परतफेड करावी लागेल. त्यानंतरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
समझोता योजना,,
जास्त कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (ओटीएस) आणली आहे. एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ अखेर अशा सहा वर्षांच्या कालावधीत व्यवहारांबाबत 'ओटीएस'ची सुविधा असेल. या सहा वर्षांच्या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीककर्जाचे किंवा याच कालावधीत वाटप केलेल्या अल्पमुदत पीककर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केले असल्यास ही सवलत मिळू शकते. राज्यभर विविध बँकांमध्ये पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
प्रोत्साहन योजनेतून किती रक्कम मिळेल,
सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जाची अशी असेल सवलत.अनेक शेतकऱ्यांनी परतफेड केलेले पीककर्ज ५० हजारांच्या आत आहे. त्यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेतून नेमकी किती रक्कम मिळेल, याविषयी संभ्रम आहे. सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, २००२३-२४ किंवा २०२४-२५ या वर्षात कर्ज घेतलेल्या व त्याची परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ५० हजारांपेक्षा कमी असल्यास या शेतकऱ्यांना त्यांनी २०२३-२४ किंवा २०२४-२५ या वर्षात त्यांनी मुद्दल व व्याजासह फेडलेली रक्कम मिळेल किंवा किमान पाच हजार रुपयांची रक्कम लाभ म्हणून दिली जाणार आहे.
पुरावे तपासले जाणार,
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत असलेली थकीत रक्कम ओटीएससाठी विचारात घेतली जाईल. अशा थकीत असलेल्या व ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड झालेल्या थकीत हप्तांची मुद्दल. व व्याजासह अधिकतम रक्कम दोन लाखाहून जास्त असू शकते. अशा प्रकरणात संबंधित शेतकऱ्याला दोन लाखावरील जास्तीच्या रकमेची आधी परतफेड करावी लागेल. परतफेड केलेल्या रकमेचा पुरावा तपासूनच संबंधित शेतकऱ्याला 'एकवेळ परतफेड योजने'त पात्र ठरविले जाईल.
प्रोत्साहनपर लाभासाठी तीन वर्षांचे व्यवहार पात्र,
दरम्यान, ५० हजारांचा प्रोत्साहनपर लाभ मिळविण्याबाबत शेतकरी वर्ग संभ्रमात आहे. काही जिल्ह्यांमधून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे या लाभासंदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे. या बाबत एका जिल्हा विशेष लेखापरीक्षकाने सांगितले की, आम्ही जिल्हा बँकांचा संभ्रम दूर केला आहे. प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी शासनाकडून २०२२-२३, २००२३- २४ आणि २०२४-२५ अशा तीन आर्थिक वर्षांचा कालावधी विचारात घेतला जाणार आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीककर्ज घेतले असल्यास असे कर्ज जर वर्ष संपल्यानंतर ३० जूनपूर्वी फेडले असल्यास किंवा संबंधित बँकेच्या नियमानुसार मुदतीत फेडले असल्यास संबंधित शेतकऱ्याला ५० हजारांची प्रोत्साहनपर लाभ योजना लागू होणार आहे.

Post a Comment
0 Comments