Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

कर्जाला कंटाळून गोहगाव हाडे येथील शेतकऱ्याची आत्महत्या,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


जिल्हाप्रीतिनिधी: मनोज जाधव,

रिसोड: तालुक्यातील गोहगांव हाडे येथिल संतोष भगवान हाडे या शेतकऱ्याच्या डोक्यावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत आसल्याने आणि दुबार पेरणीने खर्च वाढल्याने ३ ऑगस्ट रोजी गोंढाळा शिवारात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 




आत्महत्याग्रस्त मयत संतोष हाडे यांनी शेतीवर आधीच कर्ज घेतलेले होते. नंतर घरावर सुध्दा कर्ज घेतले होते. या कर्जाच्या विवंचनेत हाडे सतत आपल्या कुटुंबातील सदस्याशी चर्चा करीत होते. आज ते नातेवाईका कडे गौंढाळा येथे जातो म्हणत घराबाहेर पडले परंतु गौंढाळा येथिल व्यक्ती समाधान चंद्रकांत शिंदे यांनी घटनेची माहीती आत्महत्याग्रस्ताचा मुलगा ऋषीकेश हाडे याला दिली. हाडे कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहीती रिसोड पोलिस स्टेशनला दिली.उपनिरीक्षक वानखेडे यांना माहिती मिळताच आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित राहून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे.


 सदर कर्जबाजारी शेतक-याला यंदा पेरणी मोडुन दुबार पेरणी करावी लागली. आत्महत्याग्रस्त शेतकरी संतोष हाडे यांना पुन्हा कर्ज घेऊन दोन वेळा पेरणी केल्यामुळे आणि पहिलेच कर्ज डोक्यावर जास्त आल्यामुळे नैराश्याने आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे.


संतोष हाडे यांच्या आत्महतेने हाडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून योग्य त्या मदत मिळावी ही गावाकऱ्यांची भावना आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad