Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी राज्यपाल, पद्मश्री, डॉ. डी. वाय. पाटील यांचे दुःखद निधन,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

कोल्हापूर: शेतकरी कुटुंबातून पुढे येत कार्यकर्ता, महापौर, आमदार, राज्यपाल असा प्रेरणादायी प्रवास त्यांनी घडवला. सार्वजनिक जीवनात त्यांनी लोकसेवेची परंपरा जपली, तर शिक्षण क्षेत्रात उभारलेल्या संस्थांद्वारे लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हा विचार त्यांनी आयुष्यभर कृतीतून जपला.



काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख विचार आणि विकासाभिमुख दृष्टी कायम जोपासली. राजकारण आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी निर्माण केलेला आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.


डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या निधनाने पाटील कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगी सतेज पाटील साहेब आणि संपूर्ण परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या कठीण प्रसंगी त्यांना आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना.


भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

0 Comments

Top Post Ad