आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.नेट
जिल्हा प्रतिनिधी: समाधान राठोड,
बुलढाणा: देशभरात सुरू असलेल्या पीएम आवास योजनेचा सर्व गोरगरिबांनी लाभ घेतला असून आपल्या घराची कामे पूर्ण केली आहे. आणि काही लाभार्थी घरे न बांधताच सरकारच्या तिजोरीवर ग्रामपंचायतींच्या मदतीने डल्ला मारला आहे.अशाच कुंभेफळ ग्रामपंचायतचे सचिव श्री जाधव साहेब कधीही ग्रामपंचायत मध्ये येत नाही.परंतु पैशाची मागणी मात्र भरपूर करतात. अध्यक्ष सचिव इंजिनिअर व रोजगार सेवक या सर्वांनी मिळून ज्यांनी घरी न बांधता पैसे काढायचे आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 25 - 25 हजार रुपये जमा करून त्यांची बिले काढून दिली. व ज्या गरिबांनी घरकुले बांधलेली आहेत त्यांची बिले मात्र अद्याप लटकून ठेवलेली आहे. वारंवार तक्रार करूनही कोणीही दखल घेत नाही. तक्रारी वाढत चालल्यामुळे शेवटी पंचायत समिती सिंदखेडराजाचे गटविकास अधिकारी श्री बांगर साहेब यांनी गावांमध्ये भेट दिली व समस्या जाणून घेतली. आणि आश्वासन दिले कि,ज्यांची घरी पूर्ण आहेत त्यांचे जिओ ट्रेकिंग फोटो काढून पाठवा आम्ही लवकरच माहिती घेऊन कारवाई करू असे सांगितले.
ग्रामपंचायत सचिवाने व इतर अधिकारी कर्मचारी यांनी लाभार्थी यांचेकडून पैसे घेतलेले त्यांचे काही व्हिडिओ फुटेजेस नवराष्ट्र मराठी न्यूजच्या हाती लागले असून दहा तारखेपर्यंत गोरगरीब जनतेला न्याय न मिळाल्यास सर्व व्हिडिओ फुटेजेस सोसिअल मीडिया कडे म्हणजे सर्व टीव्ही चॅनल व यूट्यूब चैनल ला देण्यात येईल.
करिता ग्रामपंचायत स्थरावर जो काही घरकुल घोटाळा दिसून येत आहे त्या घोटाळ्याची ताबडतोब चौकशी करून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी श्री जाधव व इतर कर्मचारी यांचेवर कारवाई करावी.


Post a Comment
0 Comments