Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

वीर जवान कॅप्टन रमेश माधवराव फड यांचा सेवापूर्ती सोहळा अगदी थाटात संपन्न,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


प्रतिनिधी: समाधान राठोड,

बुलढाणा: बीबी येथून जवळच असलेल्या कुंबेफळ गावचे वीर जवान कॅप्टन रमेश माधव फड यांचा सेवापूर्ती सोहळा अगदी थाटामध्ये संपन्न करण्यात आला. सोहळ्या प्रसंगी बीबी ते कुंबेफळ रॅली काढण्यात आली. त्यांनी सगळ्यांचे दर्शन घेतले व जिल्हा परिषद शाळा कुंबेफळ येथे जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गिफ्ट ही दिले त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी मित्र माजी सैनिक सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर कार्यक्रम सोहळा बीबी येथे पडण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे माजी आमदार श्री तोतारामजी कायंदे साहेब, जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ इंगळे, बीबी गावचे सरपंच दीपकभाऊ गुलमोहर, उपसरपंच भास्कर भाऊ खुळे,ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.कार्यक्रमाची रूपरेषा प्रभू दराडे सर, मुंडे सर व सूर्यकांत कांगणे सर यांनी पार पाडली.




Post a Comment

0 Comments

Top Post Ad