Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

बॅनरवरून आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, बुलढाणा नगरपालिका प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाला पत्र,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

बुलढाणा: नगर परिषद बुलढाणा येथील अतिक्रमण विभाग प्रमुखांनी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात, राजधानी सप्लायर्स बुलढाणा यांच्यामार्फत नगर परिषद अतिक्रमण विभागात पुरविण्यात आलेल्या एकूण ८ मनुष्यबळाचा उल्लेख करण्यात आला आहे. या मनुष्यबळामध्ये विक्की आवाड, रवी गणेश आवाड, महेंद्र संतोष चव्हाण, सचिन बाबुराव शेळार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे पत्रात नमूद आहे.




हे मनुष्यबळ नगर परिषद प्रशासनाच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागाच्या दैनंदिन कामकाजासाठी उपलब्ध असून, अतिक्रमणाची पाहणी व नियंत्रण, अतिक्रमण निर्मूलन, अनधिकृत होर्डिंग-बॅनर, झेंडे तसेच रस्त्यावरील लोडिंग आदी कारवाईसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नगर परिषद प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून हे कर्मचारी काम करीत असल्याचेही नमूद आहे.


राजधानी सप्लायर्सचेही पत्र आले पुढे,

दरम्यान, राजधानी सप्लायर्स, बुलढाणा यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या स्वतंत्र पत्रात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी नगर परिषदेत विविध विभागांमध्ये मनुष्यबळ पुरविण्याच्या आदेशाचा संदर्भ दिला आहे. या आदेशानुसार अतिक्रमण विभागासाठी एकूण १० मनुष्यबळाची आवश्यकता नमूद करण्यात आली असून, त्यानुसार वरील दहा कर्मचाऱ्यांना अतिक्रमण विभागात समाविष्ट करण्याची विनंती करण्यात आली आहे.


‘समर्थक’ असल्याच्या चर्चेला पत्रांमुळे नवा संदर्भ,

यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या माध्यमांच्या वृत्तात संबंधित कर्मचाऱ्यांचा आ. संजय गायकवाड यांच्याशी असलेल्या समर्थनाचा उल्लेख झाल्याने या मनुष्यबळाच्या नियुक्तीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता समोर आलेल्या दोन्ही पत्रांमध्ये मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना राजधानी सप्लायर्समार्फत नगर परिषदेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले मनुष्यबळ म्हणून अधिकृत स्वरूपात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad