आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
जिल्हा प्रतिनिधी:समाधान राठोड,
बुलढाणा: जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा नियोजित दौरा असतांना पाहणी दौऱ्या संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे रोहिदास राठोड यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
पावसाभावी सोयाबीन, कपाशी, तूर व इतर पीके होरपळलेल्या अवस्थेत असताना शेतकरी हवालदिल झालेला असतांना व बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी रविकांत भाऊ तुपकर सोबत विश्रामगृह सिंदखेडराजा या ठिकाणी बैठक झाली. बैठकीमध्ये दुष्काळी परिस्थितीबद्दल सविस्तर चर्चा झाली.चर्चेच्या ठिकाणी रोहिदास राठोड यांनीही तूपकर भाऊ सोबतचर्चा केली.
विश्रामगृहावर तालुक्यातील असंख्य शेतकरी हजर होते. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडून सरकारकडून आपण हा विषय गंभीरपणे घ्यावा. अशी मागणी रविकांत भाऊ तुपकर यांना केली आणि त्यांनीही ग्वाही दिली. मी शेतकरी नेता आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी एकशे एक टक्का उभा आहे व शेतकऱ्यांना दिलासा मिळेलच. अशी मी राज्य सरकारसोबत चर्चा करून यामधून बळीराजा कसा बाहेर निघेल याचा पुरेपूर प्रयत्न करेल. असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी रवी भाऊचे आभार मानले व शेतकऱ्यांसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आधार मिळेल अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Post a Comment
0 Comments