Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

अवैध बायोडिझेल साठ्यावर कारवाई; 21 लाख 69 हजार रुपयांचा माल जप्त,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

मेहकर 9 सप्टेंबर : बुलढाणा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने जिल्ह्यात अवैध बायोडिझेलच्या वापराचा पर्दाफाश केला. मेहकर तालुक्यातील बायपास रोडवरील वैभव लॉन, बंजारा हॉटेल आणि सिंदखेड राजा येथील हॉटेल गावकरी फॅमिली रेस्टॉरंटसमोर सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल पंपांवर मोठी कारवाई करण्यात आली.




या कारवाईत राज्य दक्षता पथक, मुंबई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुमारे 21 लाख 69 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यामध्ये बायोडिझेल सारख्या पेट्रोलियम द्रव्याच्या साठ्यासह ऍगुड्स ट्रकचा समावेश आहे. अशोक लेलँडचा ट्रक, भुयारी लोखंडी टाकी, डिस्पेंसर युनिट, डिझेलचा साठा, पाईप व इतर साहित्य जप्त करण्यात आले.


शिधावाटप नियंत्रक तथा राज्य दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बायोडिझेलची बेकायदेशीरपणे विक्री व साठवणूक होत असल्याचे घटनास्थळी निदर्शनास आले.


जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. कोठून याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

जप्त केलेले बायोडिझेलसारखे पेट्रोलियम द्रव आणण्यात आले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास स्थानिक पोलीस व पुरवठा विभाग वेगाने करत आहेत.


या कारवाईत शिधावाटप उपनियंत्रक गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक प्रदीप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश विजयसिंह बिजनवार, मुख्य तपासणी अधिकारी नागनाथ हंगारे यांच्यासह मेहकरचे पुरवठा निरीक्षक नवुषकुमार बोरुडे, लिपिक वेदांत भावसार, उषा काकडे मॅडम, पुरवठा विभागाचे अधिकारी आर. अवैध इंधन व गॅस तस्करीवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा चंद्रकांत डांगे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad