Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

दुष्काळाच्या प्रश्नांवर रविकांत तुपकर आक्रमक; तातडीने मदत करण्याची मंत्र्यांकडे मागणी,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


महाराष्ट्र | प्रतिनिधी

राज्यात पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत शेतीपिकांवर गंभीर परिणाम झाला असून, शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली.


या भेटीदरम्यान पावसाअभावी माना टाकलेल्या सोयाबीनसह विविध पिकांची परिस्थिती, शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी आणि वाढत्या संकटाची माहिती तुपकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.


राज्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीजपुरवठा करावा, नवीन वीजजोडण्या सुरू कराव्यात आणि जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. पीक विम्याचा प्रश्नही तातडीने सोडवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.


याशिवाय सरसकट कर्जमाफी, २०१९ पूर्वीच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश, नियमित कर्जदारांना २ लाख रुपयांचे अनुदान, कर्ज पुनर्गठन तसेच रूपांतरित कर्जधारकांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.


शेतकऱ्यांचा CIBIL खराब होऊ नये, यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, तसेच मुख्यमंत्री स्तरावर RBI सोबत चर्चा करून बँकांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणीही तुपकर यांनी केली.


दरम्यान, महाडीबीटीवरील ट्रॅक्टर, स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचनाच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्नही त्यांनी मंत्र्यांसमोर मांडला. हे अनुदान तातडीने वितरित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.


या सर्व प्रश्नांवर आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक आणि ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी स्पष्ट भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad