Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

पावसावाचून बळीराजा हवालदिल; पिके संकटात, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा ओढ दिल्याने खरीप हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांतील ८३ तालुक्यांमध्ये २० दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्याची नोंद आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा तालुक्यात तब्बल ३८ दिवसांचा पावसाचा खंड नोंदवला गेला आहे. त्यामुळे उभी पिके करपण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत आहेत. 




पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर सोयाबीन, तूर,मका, बाजरी, कापूस यांसह खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पिकांना सध्या पाण्याची गरज असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्याच्या काही भागांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे. 


“पाऊस पडला तर पीक वाचेल, नाहीतर वर्षभराची मेहनत वाया जाण्याची भीती”, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत

Post a Comment

0 Comments

Top Post Ad