Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जुन्नर तालुक्यातील मराठा बांधवांचा जाहीर पाठिंबा; बैठकीत महत्त्वाचे निर्णय,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक : 

जुन्नर : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला जुन्नर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. याबाबत झालेल्या बैठकीत आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासह पुढील काळातील आंदोलनाची दिशा आणि समाजबांधवांचा सहभाग याबाबत चर्चा करण्यात आली.


बैठकीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात एकजुटीने सहभागी होणे, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे आणि पुढील आंदोलनाची दिशा जाहीर झाल्यानंतर त्यानुसार भूमिका घेणे, असे ठरल्याची माहिती देण्यात आली.यावेळी उपस्थित समाजबांधवांनी “एक मराठा, लाख मराठा” या भावनेतून शांततेच्या मार्गाने आंदोलनाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणावर असून, सरकारकडून ठोस निर्णय आणि अंमलबजावणीची मागणी करत आहेत. 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad