Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

धर्मापेक्षा माणुसकी मोठी; बेळगावातील कुटुंबाने घडवला मानवतेचा आदर्श,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

बेळगावी: (कर्नाटक )धर्म वेगळा असला तरी माणुसकी, प्रेम आणि आपुलकी यांच्यापेक्षा मोठे काहीही नाही, याचा सुंदर आदर्श कर्नाटकातील बेळगावी येथे पाहायला मिळाला.



सुमारे २० वर्षांपूर्वी रस्ता अपघातात आई-वडिलांना गमावलेल्या दोन हिंदू अनाथ भावांना मेहबूब हसन नाईकवाडी आणि नूरजहाँ या दाम्पत्याने आपल्या कुटुंबाचा एक भाग मानून त्यांना आपलेसे केले. स्वतःची पाच मुले असतानाही या दाम्पत्याने दोन्ही भावांचे प्रेमाने संगोपन केले.


विशेष म्हणजे, त्यांचे पालनपोषण करताना त्यांच्या हिंदू श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचा पूर्ण आदर या दाम्पत्याने जपला. त्यामुळे धर्माच्या भिंतीपेक्षा माणुसकीचे नाते अधिक घट्ट असल्याचे या कुटुंबाने कृतीतून दाखवून दिले.


शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोमशेखर नोकरीला लागला. त्यानंतर मेहबूब हसन आणि नूरजहाँ यांनी त्याच्याच समाजातील वधू शोधून त्याचे लग्न लावून दिले. लिंगायत परंपरेनुसार पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात त्यांनी सोमशेखरच्या आई-वडिलांची भूमिका अभिमानाने पार पाडली.


ही केवळ एका विवाहाची किंवा एका कुटुंबाची कथा नाही; तर धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.खरे कुटुंब रक्ताच्या नात्यानेच नव्हे, तर प्रेम, विश्वास आणि माणुसकीनेही घडते.


मुख्य संपादक : देविदास वायाळ,

नवराष्ट्र मराठी न्यूज,

Post a Comment

0 Comments

Top Post Ad