आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
जिंतूर | प्रतिनिधी,
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चामणी येथे पोळ्याच्या पूर्वसंध्येला काळजाचा ठोका चुकवणारी दुर्दैवी घटना घडली. बैल धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यश बबन साळवे (वय ११) आणि आदिनाथ बबन साळवे (वय ९) हे दोघे भाऊ बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी दुपारी आपल्या आजोबांसोबत शेतशेजारील शेततळ्यावर बैल धुण्यासाठी गेले होते.
बैल धुत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही भाऊ पाण्यात बुडाले. आजोबांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावून आले. मात्र, तोपर्यंत दुर्घटना घडली होती.
पोळा सणाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर सणाच्या पूर्वसंध्येलाच दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या ११ आणि ९ वर्षांच्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चामणी गावात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेने साळवे कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले असून, गावकऱ्यांमधूनही शोक व्यक्त केला जात आहे.
यश आणि आदिनाथ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर साळवे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
⚠️ पालकांनी काळजी घ्या,
शेततळी, तलाव, विहिरी किंवा इतर जलस्रोतांजवळ लहान मुलांना एकटे जाऊ देऊ नका. पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज नसल्याने क्षणात दुर्घटना घडू शकते.
नवराष्ट्र मराठी न्यूज,
मुख्यसंपादक – देविदास वायाळ


Post a Comment
0 Comments