आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींचे तत्काळ निवारण व्हावे, तसेच नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहज भेट मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यानुसार, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार या महसूल अधिकाऱ्यांना प्रत्येक कार्यालयीन दिवशी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंतची वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
या दोन तासांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या अंतर्गत बैठका अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) आयोजित करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना अधिकाऱ्यांची भेट घेण्यात अडचण येऊ नये, यासाठी संबंधित कार्यालयांच्या दर्शनी भागात ‘नागरिक भेटीची वेळ : दुपारी ३ ते ५’ असा सूचना फलक लावणेही आवश्यक करण्यात आले आहे.
दरम्यान, एखाद्या तातडीच्या शासकीय कामामुळे संबंधित अधिकारी या वेळेत उपलब्ध नसल्यास, पर्यायी अधिकाऱ्याची नियुक्ती करून नागरिकांच्या भेटीची व्यवस्था कायम ठेवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांना आपल्या तक्रारी व समस्या मांडण्यासाठी वारंवार मंत्रालय अथवा वरिष्ठ कार्यालयांमध्ये जाण्याची वेळ येऊ नये, तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.


Post a Comment
0 Comments