आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
IPS राहुल बंसल यांचा एक जुना व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. त्यात लाचखोरीविरोधात बोलणारे राहुल बंसल आता ₹१ कोटींच्या लाच प्रकरणाच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहेत.
सविस्तर माहितीनुसार आरोप असा आहे की, एका सायबर फ्रॉड प्रकरणात संबंधित विषय मिटवण्यासाठी आणि आरोपींवर कारवाई न करण्यासाठी ₹१ कोटींची रक्कम लाच म्हणून उकळण्यातआली. या प्रकरणी दिल्लीतील विशेष CBI न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत IPS राहुल बंसल यांच्यासोबतच सहायक उपनिरीक्षक प्रवीण कुमार राठोड आणि कॉन्स्टेबल अंशुल शर्मा यांचीही नावे असल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे राहुल बन्सल यांनी काही दिवसापूर्वी आपल्या भाषणात सांगितलं होतं की, ५०० रुपायाचीही लाच घेऊ नका. आणि आता मात्र स्वतःच अडकलेले आहेत. दुसऱ्यांना प्रामाणिकपणाचे धडे देणे सोपे असते पण स्वतः त्या तत्त्वांवर चालणे किती कठीण? ५०० च्या लाचेवर तत्त्वज्ञान सांगणाऱ्या अधिकाऱ्यावरच जर ₹१ कोटींच्या लाचेचा आरोप होत असेल, तर सामान्य माणसाने या व्यवस्थेवर विश्वास तरी कसा ठेवायचा?

Post a Comment
0 Comments