आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
बुलढाणा: लोणार तालुक्यातील खळेगावफाटा ते खळेगाव या रोड चे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत फाटा ते खळेगाव गावापर्यंत मागील २ वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र सध्या परिस्थितीत या रोडवर ५० % डांबरही शिल्लक राहिलेले दिसत नाही पण खूप मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि ही परिस्थिती असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून बसला आहे.
खळेगाव ते खळेगाव फाटा हा रोड मुख्य महामार्गाला जोडणारा रोड असून मागे शेंदुर्जन मार्गे बुलढाणा जाणारा मुख्य मार्ग आहे. हाच मुख्य रोड संपूर्ण खड्यांनी अस्तव्यस्त झाला आहे. जागदारी, कंडारी, भंडारी, येथील लोकांना आपली वाहने मेहकर व जालना जाण्यासाठी याच मुख्य रस्त्याने घेऊन जावे लागते. आणि महामार्गाला जोडलेला मुख्य रोड हाच असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.शाळेतील मुलांना जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे हा २ की.मी रोड मागील दोनच वर्षापूर्वी नूतनीकरण करण्यात आला होता.आणि दोनच वर्षात आता, सध्या भले मोठ मोठे खड्डे पडल्याने प्रश्न निर्माण होतो की काय या रस्त्याच्या कामात महाभ्रष्टाचार झाला तर नाही? पडलेल्या गड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे व साचलेल्या पाण्यामुळे खड्डा दिसत नाही आणी लहान वाहनांचा अपघात होण्यापासून नाकारता येत नाही.
खळेगाव येथील रोडच्या अशा झालेल्या खड्यांच्या परिस्थितीत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गड्ड्यात पाणी साचत असल्यामुळे पडलेल्या गडयांना जेसीबीच्या साहाय्याने रोडच्या साईड खोदून, चरा पाडून पाणी नालीत दांडाद्वारे काढून देण्याचा भला मोठा कारनामा केला आहे. परंतु रोड दुरुस्ती करण्यासाठी कोणताही प्रयत्न मात्र करण्यात आला नाही.
शासनाने तात्काळ दखल घेऊन व खड्डेमय झालेल्या रस्त्याचे प्रकरण त्वरित निकाली काढून रस्ता खड्डेविरहित करावा ही संपूर्ण खळेगाव येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

Post a Comment
0 Comments