Type Here to Get Search Results !

न्यूजरूममध्येच घडणार उद्याचे पत्रकार! एमजीएम विद्यापीठ आणि सकाळ माध्यम समूहाची अभिनव भागीदारी,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

 विद्यार्थ्यांना प्रिंट,टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी मिळावी यासाठी एमजीएम विद्यापीठ आणि सकाळ माध्यम समूहाने अभिनव भागीदारी केली आहे.



“पत्रकारिता ही केवळ बातमी लिहिण्याची कला राहिलेली नाही; ती आता व्हिडिओ, डेटा, सोशल मीडिया, पॉडकास्ट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील बहुआयामी संवादकला बनली आहे.” अशा बदलत्या काळात पत्रकारितेचे शिक्षणही बदलणे ही काळाची गरज आहे. याच विचारातून एमजीएम विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडिया आणि सकाळ माध्यम समूह यांच्यात झालेला सामंजस्य करार हा केवळ एक औपचारिक करार नसून उद्योग आणि शिक्षण यांच्यातील सशक्त सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.


एम जी एम विद्यापीठ आणि सकाळ समूहाची अभिनव भागीदारी,

आज माध्यमविश्व वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्लॅटफॉर्म, मोबाईल पत्रकारिता आणि सोशल मीडिया यांच्या प्रभावामुळे पत्रकारितेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना केवळ वर्गातील शिक्षण पुरेसे ठरत नाही; त्यांना प्रत्यक्ष न्यूज रूमचा अनुभव, संपादकीय प्रक्रियेची ओळख आणि उद्योगातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. एमजीएम विद्यापीठ आणि सकाळ माध्यम समूह यांच्यातील सहकार्य या गरजेची प्रभावी पूर्तता करणार आहे.


या सामंजस्य करारामुळे बी.ए. मल्टीमीडिया जर्नालिझम अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप, तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा, न्यूज रूम भेटी आणि प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी होऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच व्यावसायिक जगाची ओळख होईल.


विद्यार्थी पत्रकारितेकारिता सक्षम बनणार,

आजचा पत्रकार केवळ बातमी लिहित नाही, तर तो व्हिडिओ शूट करतो, मोबाईलवरून थेट प्रक्षेपण करतो, डेटा विश्लेषित करतो, पॉडकास्ट तयार करतो आणि सोशल मीडियासाठी प्रभावी डिजिटल कथा सांगतो. ही सर्व कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी एमजीएम विद्यापीठाने अभ्यासक्रमाची रचना आधुनिक माध्यमांच्या गरजांनुसार केली आहे. मोबाईल जर्नालिझम, डेटा जर्नालिझम, व्हिडिओ स्टोरीटेलिंग, पॉडकास्टिंग, ग्राफिक्स डिझाइन, डिजिटल कंटेंट निर्मिती आणि मीडिया एथिक्स यांसारख्या विषयांमुळे विद्यार्थी आधुनिक पत्रकारितेसाठी सक्षम बनतील.


शिक्षणातून पत्रकारिता घडवण्याचा प्रयत्न,

या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवी पत्रकार, संपादक आणि मीडिया व्यावसायिक यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल, व्यावसायिक शिस्त अंगीकारता येईल आणि रोजगाराच्या संधीही अधिक व्यापक होतील. शिक्षणातून रोजगार आणि रोजगारातून समाजाभिमुख पत्रकारिता घडविण्याचा हा एक प्रभावी प्रयत्न आहे.


एमजीएम सकाळ यांचा करार,

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये अनुभवाधारित, कौशल्याधारित आणि उद्योगसंलग्न शिक्षणावर भर देण्यात आला आहे. एमजीएम विद्यापीठ आणि सकाळ माध्यम समूह यांच्यातील हा करार त्या धोरणाच्या अंमलबजावणीचे उत्कृष्ट उदाहरण ठरतो. ज्ञान, कौशल्य आणि मूल्ये यांचा समतोल साधणारे शिक्षण विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनवेल.


दोन्ही समूहाचे उपास्तीत प्रतिनिधी,

या सामंजस्य करारावर सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके तसेच सकाळच्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे संपादक संतोष शाळीग्राम यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, डेप्युटी रजिस्ट्रार परमिंदर कौर, तसेच सकाळ माध्यम समूहाचे युनिट हेड संजय चिकटे आणि निलेश राऊत उपस्थित होते.


शिकण्याची मिळणार संधी,

या करारामुळे बी.ए. मल्टीमीडिया जर्नालिझमच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची व्याप्ती वर्गखोलीपुरती मर्यादित राहणार नाही. त्यांना थेट सकाळ माध्यम समूहाच्या विविध मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करण्याची आणि शिकण्याची संधी मिळणार आहे. 


नवीन संधीचे उघडणार दालन,

शिक्षण आणि उद्योग यांचा संगम घडविणारे हे सहकार्य विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींचे दालन उघडणारे आहे. वर्गखोलीतील ज्ञान आणि न्यूज रूममधील अनुभव यांची सांगड घालत उद्याच्या जबाबदार, तंत्रस्नेही आणि समाजाभिमुख पत्रकारांची नवी पिढी घडविण्याची क्षमता या उपक्रमात आहे. त्यामुळे हा सामंजस्य करार केवळ दोन संस्थांमधील करार नसून, भविष्यातील भारतीय पत्रकारितेच्या दिशेने टाकलेले दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad