आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
ता. प्रीतिनिधी: शिवाजी औदगे,
मेहकर: उकळी येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेत दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी शाळेतील इयत्ता 4 थी 5 वी मधील शिष्यवृती उत्तीर्ण तथा पात्र विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले जवाहर नवोदय विद्यालय शेगांव येथे निवड झालेल्या विद्यार्थीनीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री विष्णु भाऊ जेठे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य हे होते या कार्यक्रमा साठी प्रमुख अतिथी म्हणून सौ.सविता नामदेव घाटोळ शा. समिती अध्यक्षा तथा श्री गजानन भाऊ पातळे शा. व्य.स. सदस्य व श्री राजेश भाऊ अंभोरे शा.व्य.स.सदस्य हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली.या प्रसंगी इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनी कु.स्वरा तनपुरे, कु.शीतल सासवडकर व इतर वर्ग 5 चे शिष्यवृत्ती पात्र विदयार्थी तसेच वर्ग 4 च्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी कु. माधुरी पातळे, कु. ईश्वरी घाटोळ, कार्तिक तुरुकमाने, कु. गौरी जेठे, कु. गौरी दांदडे. प्रतिक जुमडे जवाहर नवोदय विद्यालय शेगांव येथे निवड झालेल्या कु . हर्षदा आळणे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच वर्ग 5 चे वर्ग शिक्षक श्री, नरेश दसरे सर व श्री. किरण डोंगरदिवे सर व वर्ग 4 च्या वर्ग शिक्षिका सौ. सविता बबन रत्नपारखी मॅडम यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उकळी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्रप्रमुख श्री गजानन अंभोरे हे उपस्थित होते.तसेच श्री संदीप लादे सर, श्री दिलीप डव्हळे सर, श्री दत्तात्रय चांगाडे सर, कु. नूतन दिक्षित मॅडम, कु. सविता कावरे मॅडम, श्री शैलेश देशमुख सर,अंगणवाडी सेविका व मदतनीस तथा सर्व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments