आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे एका शेतकरी पुत्राला गांजा बाळगल्याच्या संशयावरून पोलिसांनी अडविल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी शेख हातम यांचा मुलगा शेख जावेद हा दुचाकीने जात असताना सोनाळा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून तपासणी करण्याची तयारी केल्याचे सांगितले जाते. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
ग्रामस्थांनी संबंधित युवकावरील संशयाचा आधार काय, असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई न करता तेथून निघून गेल्याची चर्चा आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे व दोषी आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या प्रकरणात पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाही.

Post a Comment
0 Comments