Type Here to Get Search Results !

पाडळी शिंदे येथील शिक्षकाचा समृद्धी महामार्गावर संशयास्पद मृत्यू,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


प्रीतिनिधी : समाधान राठोड,

 सिंदखेडराजा: झोटिंगा येथील जिल्हपरिषद शाळेवर कार्यरत असलेले  पाडळी शिंदे येथील शिक्षक जगन्नाथ मधुकर शिंदे यांचा समृद्धी महामार्गावर संशयास्पद मृत्यू झाला आहे.विषारी औषध प्राशनाची प्राथमिक शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती आहे. किनगाव राजा पोलिसांकडून मरणोत्तर पंचनामा झाला असून अद्याप गुन्हा दाखल नाही.





अद्याप गुन्हा दाखल नाही,

सिंदखेराजा तालुक्यातील झोटीगा येथे  जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक जगन्नाथ मधुकर शिंदे रा पाडळी शिंदे यांचा शुक्रवारी (दि. ३१ जुलै) समृद्धी महामार्ग परिसरात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन आणि पुढील तपासानंतरच याबाबत निश्चित माहिती समोर येणार आहे. किनगाव राजा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये घटनेची नोंद करून घटनास्थळी मरणोत्तर पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.


 घटनास्थळावरील परिस्थिती,

 प्राथमिक माहितीनुसार विषारी पदार्थाचे सेवन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल तसेच आवश्यक असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे पाडळी शिंदे गावासह झोटीगा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षकी क्षेत्रात कार्यरत असलेल्या जगन्नाथ मधुकर शिंदे यांच्या अकस्मात निधनामुळे त्यांच्या सहकाऱ्यांसह विद्यार्थ्यांमध्येही शोककळा पसरली आहे.दरम्यान, किनगाव राजा पोलीस या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी करीत असून, शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad