Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अंदाज समितीचा तीन दिवसीय बुलढाणा दौरा, दौऱ्याच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; सर्व विभागांना वेळेत तयारी पूर्ण करण्याचे निर्देश,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

बुलढाणा, दि. 24 (जिमाका): महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अंदाज समितीचा ३० जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्याचा तीन दिवसीय दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.




बैठकीत अंदाज समितीच्या दौऱ्यादरम्यान विविध शासकीय योजनांचा आढावा, विकासकामांचे सादरीकरण तसेच प्रत्यक्ष पाहणीबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना त्यांच्या अखत्यारीतील विकासकामांची अद्ययावत व अचूक माहिती तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या. समितीसमोर सादर करण्यात येणारी आकडेवारी स्पष्ट, पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी, यावर त्यांनी विशेष भर दिला.


यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देवरे म्हणाले की, विधिमंडळ अंदाज समितीचा हा दौरा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून कोणत्याही विभागाने कामात हलगर्जीपणा करू नये. प्रशासकीय स्तरावरील सर्व तयारी वेळेत पूर्ण करून समितीसमोर प्रभावी सादरीकरण करावे.


दौऱ्यादरम्यान समितीकडून जिल्ह्यातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा आणि जनकल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. कृषी, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण आदी विभागांनी आपले अहवाल अंतिम स्वरूपात तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच समिती सदस्यांच्या प्रश्नांना तात्काळ व अचूक उत्तरे देता यावीत, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी संपूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय समिती सदस्यांच्या निवास, वाहतूक व्यवस्था, भोजन, दौऱ्याचे नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.


या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाव खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड तसेच उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad