Type Here to Get Search Results !

खासगी वाहनांवरील 'पोलीस' पाटीला ब्रेक, हायकोर्टाच्या दणक्यानंतर राज्यभर कारवाईचे आदेश,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

मुंबई: राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावणे महागात पडण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अशा प्रकारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना कारवाईबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.




Police Stickers on Private Vehicles: वाहनांवर पोलिसाची पाटी लावल्यास यापुढे कारवाई केली जाणार आहे. कोर्टाच्या दणक्यानंततर राज्यभर कारवाईचे आदेश देण्यात आले.

•खासगी वाहनांवरील पोलीस पाटीवर कारवाई,

•मुंबई उच्च न्यायालयाचा पोलीस पाटीबाबत आदेश,

•खासगी कारवर पोलीस लिहिल्यास दंड,

•महाराष्ट्रात पोलीस स्टिकरवर बंदी,

•मोटार वाहन कायद्यानुसार होणार कारवाई,


अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने यासंदर्भातील पत्र राज्यभर पाठविले असून, खासगी वाहनांवर 'पोलीस' अशी पाटी अथवा लाल अक्षरात 'पोलीस' लिहिलेल्या वाहनांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३३ (६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १७७ अंतर्गत कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.


सखाराम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर हा विषय पुढे आला. तक्रारीत, 'पोलीस' लिहिलेल्या खासगी वाहनांची तपासणी अनेकदा टाळली जाते. त्यामुळे अशा वाहनांचा अवैध वस्तूंची वाहतूक, बेकायदेशीर कृत्ये किंवा दहशत निर्माण करण्यासाठी गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले होते.


या पार्श्वभूमीवर हायकोर्टानेही अशा प्रथेवर तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यापुढे खासगी वाहनांवर 'पोलीस' अशी पाटी किंवा मजकूर आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad