आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
देऊळगाव राजा: समाजाची प्रतिमा मलिन होऊ नये आणि भावी पिढीच्या भविष्यात कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी स्वतः शिकलगर समाजानेच एक अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. समाजातील काही मोजक्या व्यक्तींच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे संपूर्ण समाजाला बदनाम होऊ न देण्याचा निर्धार करत, शिकलगर समाज बांधवांनी थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे दरवाजे ठोठावले आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 'त्या' व्यक्तींवर कायदेशीर सखोल चौकशी करून आवश्यक असल्यास *जिल्हाबंदीची (तडीपारीची) कारवाई करावी*, अशी थेट मागणी स्वतः समाजानेच प्रशासनाकडे केली आहे.
म्हणून समाजाने उचलले हे मोठे पाऊल,
देऊळगाव राजा परिसरात शिकलगर समाज गेल्या अनेक दशकांपासून वास्तव्यास आहे. बहुसंख्य समाजबांधव अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करून शांततेत आपले जीवन जगत आहेत. मात्र प्रतिमेला धक्का समाजातील काही मोजक्या व्यक्तींच्या कथित बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्यांमुळे संपूर्ण प्रामाणिक समाजाची प्रतिमा मलिन होत आहे.
महिला व बालकांना मनस्ताप,
या चुकीच्या प्रवृत्तींमुळे समाजातील महिला, पुरुष आणि निष्पाप बालकांना समाजात वावरताना कमालीच्या अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. भविष्यातील अडथळे रोखण्यासाठी येणाऱ्या पिढीला आणि समाजाला भविष्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून समाजाने स्वतःहून पुढे येत या गुन्हेगारी प्रवृत्तींना कायमचा चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,समाजबांधवांची मोठी उपस्थिती,
शिकलगर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी *डॉ. प्रवीणकुमार देवरे* आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले. संबंधित दोषी व्यक्तींवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला असून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना उपस्थित समाजबांधव,
हे ऐतिहासिक पाऊल उचलताना शिकलगर समाजाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने: पापासिंग बावरे, दिलीपसिंग बावरे, दयासिंग बावरे, अजित सिंग बावरे, प्रधान सिंग बावरे, मायसिंग बावरे, नानक सिंग बावरे, गोपी सिंग बावरे, जोगिंदर सिंग बावरे, अर्जुन सिंग बावरे, बलवंत सिंग बावरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
समाजाचा चा थेट संदेश: समाजाचे हित हेच सर्वोपरी!
स्वतःच्याच समाजातील चुकीच्या घटकांविरोधात एकत्र येऊन प्रशासनाकडे कारवाईची मागणी करणे, हे अत्यंत धाडसी आणि महाराष्ट्रातील इतर समाजांसाठी एक आदर्श उदाहरण ठरणारे पाऊल आहे. *"चुकीच्या माणसांना पाठीशी घालणार नाही आणि समाजाचे भविष्य अंधारात ढकलणार नाही,"* असाच एक खणखणीत संदेश या माध्यमातून शिकलगर समाजबांधवांनी दिला आहे.


Post a Comment
0 Comments