आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
जालना: उच्च शिक्षण आणि करिअरच्या शर्यतीमुळे मुली उशिरा लग्न करतात. परिणामी लोकसंख्या घटत चालली आहे. समाजाची घटती लोकसंख्या यांसारख्या गंभीर समस्योंमुळे माहेश्वरी समाजांने 'आधी लग्न करा, मग शिक्षण घ्या' असा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मुलींचे विवाह त्यांच्या वयाच्या 22 वर्षांच्या आत निश्चित करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. 22 वषीपेक्षा कमी वयात मुलींचों विवाह संपन्न करत, अशा पालकांना समाजाच्या वतीने 51 हजार रुपयांची रोख प्रोत्साहन रक्कम दिली जाते.
माहेश्वरी विवाह समिती, जालना यांच्याद्वारे 2025 मध्ये हा उपक्रम सुरू झाला. पहिल्या वर्षी 21 वर्षापूर्वी विवाह करणान्या कुटुंबांना 1 लाख रूपये आणि 22 वर्षांपूर्वी विवाह करणान्यांना 51 हजार रुपये दिले गेले होते. त्याला लाभ 6 कुटुंबांनी घेतला. दुसन्या वर्षी नियमांत बदल केला. आता 22 वर्षांची वयोमर्यादा वा 51 हजारांची बक्षीसाची रक्कम निश्चित केली. या वर्षी दोन कुटुंबांनी याला लाभ घेतला आहे. उच्च शिक्षण व करिअरमध्ये स्थिरता मिळवण्यासाठी प्रयत्नात मुलींचे वय 30-32 वर्षापर्यत पोहोचते, असे समाजातील ज्येष्ठांचे म्हणणे आहे.
उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवर समर्थन,
या मोहीमेचे सकारात्मक परिणाम दिसतात. गेल्या वर्षी अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काब्रा यांनी ती देशात लागू करण्याची गरज व्यक्त केली. तसेच या उपक्रमाचा लाभ जलन्यासह मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत मिळतो.
आजच्या काळात उच्च शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्थैर्याच्या शर्यतीत विवाहाचे वय सातत्याने पुढे ढकलले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक समाजांमध्ये उशिरा विवाह, घटता जन्मदर आणि बदलती लोकसंख्या ही चिंतेची बाब बनली आहे.
याच पार्श्वभूमीवर माहेश्वरी समाजाने एक वेगळा निर्णय घेतला आहे. मुलींचा विवाह योग्य वयात व्हावा आणि त्यानंतरही शिक्षण सुरू ठेवता यावे, या उद्देशाने "आधी लग्न, मग शिक्षण" या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरात चर्चा रंगली आहे.
समर्थकांच्या मते, योग्य वयात विवाह झाल्यास कुटुंबव्यवस्था मजबूत राहण्यास मदत होऊ शकते, तसेच लोकसंख्येतील घट रोखण्यासही हातभार लागू शकतो. दुसरीकडे, काहींच्या मते शिक्षण आणि करिअरच्या संधींवर त्याचा परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
सध्या अनेक तरुण-तरुणी उच्च शिक्षण आणि करिअरमुळे तिशीनंतर विवाह करत आहेत. त्यामुळे कुटुंब नियोजनासह सामाजिक आणि लोकसंख्याविषयक प्रश्नांवरही चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर माहेश्वरी समाजाचा हा उपक्रम अनेकांसाठी अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे.
तुमचे मत काय?
योग्य वयात विवाहाला प्राधान्य देणारे असे उपक्रम इतर समाजांनीही स्वीकारावेत का? की शिक्षण आणि करिअरलाच प्रथम प्राधान्य असावे?
मराठवाड्यात अनोखा उपक्रम • मुलींचे 22 वा वर्ष लग्न केल्यास 51 हजारांचे बक्षीस उशिरा लग्न,
• आवाज मराठी मनाचा ! सत्य सस्कृती समाज वंशवृद्धीतील घट रोखण्याचा माहेश्वरी समाजाचा निर्णय : 'आधी लग्न करा,मग शिक्षण!
#माहेश्वरीसमाज #सामाजिकचर्चा #लग्नआणिशिक्षण #महाराष्ट्र

Post a Comment
0 Comments