आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
ता.प्रीतिनिधी: गणेश चव्हाण
बीबी: लोणार तालुक्यातील बीबी हे गाव मेहकर ते जालना हायवेवर येत असून या गावात काही भागात पारधी समाजाची घरे आहेत.आणि या वस्तीमध्ये ग्रामपंचायतच्यामाध्यमातून रस्ते बांधलेले आहेत. मात्र या रस्त्यांना नाली बांधलेली दिसत नाही. जे सरकारी रस्त्याचे काम केलेलं आहे तो रस्ता सुद्धा बंद आहे. पारधी समाजाच्या बांधवांनी या रस्त्यावरच बाथरूम बांधून ठेवलेले आहेत. त्या कारणाने जा-ये करणाऱ्या लोकांना खूप त्रास होत आहे आणि गल्लीतले पावसाचे व सांडपाणी घरात घुसून त्यामुळं लहान लेकरं व मोठी माणसं आजारी पडत आहे. तरी या सर्व गोष्टीकडग्रामपंचायत वारंवार दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायत मध्ये जाऊन वारंवार सांगून सुद्धा या गल्लीचं काम होत नाही. कुठलाही सोच खड्डा सुद्धा यांनी बनवलेले नाही. गोर गरीब लोक इथे राहतात.सर्वांना त्रास होत आहे. करिता प्रशासनाला विनंती आहे की,असे रस्ते खुले करून द्यावेत व या रस्त्यांना लगत नालीचे बांधकाम करण्यात यावे. सरपंचांनी व ग्रामसेवकाने याची लवकरात लवकर दखल घेऊन सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Post a Comment
0 Comments