आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अति मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. विशेषत: झाडे पडणे, इमारत कोसळणे, वाहतूक व्यवस्था, रस्त्यावर पाणी साचणे, नागरिकांच्या सुरक्षितता तसेच विविध नागरी सुविधा यावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या तथा माजी महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते. शिवसेना शिष्टमंडळात आमदार सुनील प्रभू, आमदार अनिल परब, आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, आमदार महेश सावंत, नगरसेविका पद्मजा चेंबूरकर, अबोली खाडे व नगरसेवक प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवदेनात किशोरी किशोर पेडणेकर यांनी यांनी नमूद केले आहे की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री महोदयांना अवगत करणे गरजेचे आहे. मुंबईच्या विद्यमान महापौरांकडे याविषयी वेळोवेळी पत्रव्यवहार करून विविध प्रश्न मांडले आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतेही लेखी उत्तर प्राप्त झालेले नाही. तसेच महापौर कार्यालयाकडे विचारणा केल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्री यांनी तातडीने उपायोजना आखण्याबाबत महापौरांना निर्देश द्यावेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करावी आणि आवश्यक निर्णय घेण्यासाठी सकारात्मक पुढाकार घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments