आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
मुंबई: मुंबईतील विधानभवनासमोर शेतकऱ्यांनी उभारलेल्या तीव्र आंदोलनानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत जलसंपदामंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांच्या मध्यस्थीने रविकांत तुपकर व शेतकरी नेत्यांबरोबर सविस्तर बैठक झाली.या बैठकीत सरसकट, विना अट-विना शर्थ कर्जमुक्ती, कर्जमाफी योजनेतील जाचक निकष व अटी रद्द करणे, हक्काचा पीकविमा, पीक कर्ज, बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई, बँकांकडून होणारी अडवणूक, सोयाबीन-कापसाला रास्त भाव, सौरपंपाऐवजी वीज जोडणी यासह शेतकऱ्यांच्या तब्बल ३५ महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठामपणे मांडल्या.
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी व निकषांमध्ये सकारात्मक बदल करण्याचे आश्वासन दिले असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.आता सरकारला ८ ते १० दिवसांचा वेळ आहे. आश्वासनाचे कृतीत रूपांतर झाले, तर त्याचे स्वागतच असेल. मात्र पुन्हा फसवणूक झाली, तर पुढच्या वेळी मोजके कार्यकर्ते नाही, तर हजारो-लाखो शेतकरी मुंबईत धडकतील.अशी माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा हा संघर्ष थांबलेला नाही... निर्णय होईपर्यंत लढा सुरूच राहील! - रविकांत तुपकर,
#सरसकट_कर्जमुक्ती
#विधानभवन #बैठक #मुंबई

Post a Comment
0 Comments