Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

मुलीनेच रचला जन्मदात्या आईला संपवण्याचा कट, ७ लाखात सुपारी,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक : 

राजस्थान: जयपूर मधील २३ वर्षांची मुलगी शिक्षित कायद्याचं शिक्षण घेणारी  पण पोलिसांच्या तपासानुसार तिने स्वतःच्या आईलाच संपवण्याचा कट रचला. कारण काय होतं माहिती आहे ? सरकारी नोकरी आणि कोट्यवधींची मालमत्ता.




 राजस्थानमधील जयपूर येथील घटना,

३ जुलै २०२६ रोजी प्रताप नगर परिसरात ४५ वर्षीय नीरज शर्मा यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सुरुवातीला हा अपघात असल्याचं वाटत होतं. मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. नीरज शर्मा या न्यायालयात लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळाली होती.


पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांची २३ वर्षांची मुलगी आयुषी शर्मा ही एलएलबीचं शिक्षण घेत होती. तपासात असं समोर आलं की, आयुषीला आईची सरकारी नोकरी आणि कुटुंबाची मालमत्ता हवी होती. मात्र नीरज शर्मा आपल्या मानसिकदृष्ट्या आजारी मुलाच्या भविष्यासाठी विचार करत होत्या. यावरून कुटुंबात वाद सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.


तपासानुसार, हा रस्ता अपघात नव्हता. नीरज शर्मा यांच्या गाडीला स्कॉर्पिओने धडक देऊन अपघाताचा बनाव रचण्यात आला होता. यासाठी सुमारे सात लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेच्या काही महिन्यांपूर्वीही असाच एक प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तो अयशस्वी ठरला.


सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि चौकशीनंतर पोलिसांनी आयुषी शर्मा, तिचा काका आणि इतर आरोपींसह एकूण सात जणांना अटक केली आहे. एका आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.


हे प्रकरण सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे. पोलिसांनी केलेले आरोप न्यायालयात सिद्ध होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे अंतिम निर्णय न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल

Post a Comment

0 Comments

Top Post Ad