आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
मुख्यसंपादक :देविदास वायाळ,
www.navrashtramarathinews.in.net
जिल्हाप्रीतिनिधी: समाधान राठोड,
बुलढाणा: जिल्हा सहकारी केंद्रीय बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सिंदखेडराजा प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था मतदारसंघातून माजी मंत्री तथा ज्येष्ठ सहकार नेते डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी अर्ज भरला होता.अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार दत्ताराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने माजी मंत्री मा. डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सिंदखेडराजा प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था मतदारसंघातून माजी मंत्री तथा ज्येष्ठ सहकार नेते माजी मंत्री मा.डॉ. राजेंद्रजी भास्करराव शिंगणे साहेब यांची अविरोध निवड झाली आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार दत्ताराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते आणि एकमेव नेतृत्व म्हणून मा. डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेबांना ओळखले जाते अनेक वर्षे सहकार चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ. शिंगणे यांच्या अविरोध निवडीमुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध सहकारी संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून जिल्हा बँकेच्या आगामी संचालक मंडळात त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे.
जिल्हा सहकारी बँक निवडणुकीतील अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर इतर अनेक मतदारसंघांमध्येही राजकीय समीकरणे बदलतांना दिसत आहे. काही ठिकाणी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. तर काही ठिकाणी थेट समोरासमोर लढती रंगणार आहेत. त्यामुळे अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीचे संपूर्ण चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. आणि सहकार क्षेत्रातील या घडामोडीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले असून आगामी काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या स्थापनेत कोणते नवे राजकीय समीकरण तयार होते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.सध्यातरी समर्थकांमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे.
या मतदारसंघातून सुरुवातीला डॉ. राजेंद्र शिंगणे आणि दत्ताराव देशमुख या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध ठरल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती.शेवटी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी दत्ताराव देशमुख यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.


Post a Comment
0 Comments