आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
जिल्हा प्रीतनिधी: समाधान राठोड,
सिंदखेडराजा: कुंभेफळ येथे रात्री सततधार पाऊस पडल्यामुळे विहिरीमध्ये पाणी घुसले असून पिण्याच्या पाण्याच्या विहिरीलगत, आजूबाजूला घाणीच्या साम्राज्याचा वावर आहे. कोणतीही सफसफाई नसल्यामुळे घाण पाणी पूर्णपणे विहिरीमध्ये घुसले असल्यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले आहे.
दिनांक २९ जुलै च्या मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस सुरु झाला असल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळील वाहते पाणी विहिरीत घुसले असून पूर्ण पाणी दूषित झालेले आहे.विहिरीतील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे खूप बेहाल होत आहेत. विहिरीचे पाणी पूर्णपणे खराब झाल्यामुळे महिलांना चिखल तुडवत गावापासून लांब असलेल्या शेतातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे.
प्रशासनाने व आरोग्य विभागाने तात्काळ पाहणी करून गावाला पाणी पिण्यायोग्य कसे देता येईल याकडे लक्ष द्यावे.व रोगराई पसरणार नाही याची काळजी घ्यावी.


Post a Comment
0 Comments