आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
लोणार: बीबी पोलीस स्टेशन येथील हेड कॉनस्टेबल सतीश रामभाऊ नागरे यांना अनिल दराडे गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीच्या पीसीआरमध्ये वाढ न करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) च्या बुलढाणा पथकाने आज मंगळवार दि. 28 जुलै रोजी किनगाव जट्टू बसस्थानक परिसरात सापळा रचून रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकरण काय होते ?
तक्रारदाराचे भाऊ व पुतण्या यांच्याविरुद्ध बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यातील पीसीआर वाढ न करण्यासाठी आणि संबंधित गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश रामभाऊ नागरे वय 40, रा. जळका ता. सिंदखेडराजा यांनी सुरुवातीला ₹6,000 ते ₹7,000 लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
एसीबी ने रचला होता सापळा,
तक्रारीची पडताळणी 28 जुलै रोजी करण्यात आली. पडताळणी दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याने तडजोडीअंती ₹5,000 स्वीकारण्यास संमती दिली.तक्रारदाराच्या माहितीनुसार एसीबीने किनगाव जट्टू बसस्थानक परिसरात सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ₹5 हजारांची लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल सतीश नागरे यांना रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई,
ही कारवाई एसीबी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाणा घटकाचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चौरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे व एसीबी बुलढाणा पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.
एसीबी बुलढाणा यांचे आवाहन,
शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक भागोजी चौरमले यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments