आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
बुलढाणा: वैवाहिक आयुष्यातील सततचे वाद आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक आणि वेदनादायी घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मृतदेहाची पाहणी करताना खिशात चार चिठ्ठ्या आढळून आल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या आईच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा येथील घटना,
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथील रहिवासी असलेला तरुण सुरज रामभाऊ तेजनकर याचा विवाह सन २०२१ मध्ये मोहाडी (तालुका सिंदखेडराजा) येथील वंदना ज्ञानेश्वर रिंढे हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर या दांपत्याला एक मुलगी झाली. मुलगी नऊ महिन्यांची असतानाच वंदना ही पतीचे घर सोडून आपल्या वडिलांकडे मोहाडी येथे राहण्यासाठी निघून गेली होती.
प्रेमसंबंध असल्याचा संशय,
मिळालेल्या माहितीनुसार, वंदना हिचे बोरगाव काकडे (तालुका चिखली) येथील रहिवासी असलेल्या सतीश रामेश्वर काकडे नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आणि आरोप सुरज याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याच अनैतिक संबंधांच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने खटके उडत होते आणि मोठे वाद निर्माण होत होते. कौटुंबिक क्लेश वाढल्याने सुरज हा पत्नीकडे वारंवार फारकत (घटस्फोट) देण्याची मागणी करत होता.
मानसिक त्रासाला कंटाळून संपवले जीवन,
परंतु, पत्नीकडून फारकत देण्यास नकार दिला जात होता. तसेच या वादाच्या पार्श्वभूमीवर वंदना हिने चिखली पोलीस ठाण्यात सुरज याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या कायदेशीर कारवाईनंतर आणि पत्नीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून सुरज याने अंढेरा येथील आपल्या काकांच्या शेतात जाऊन टोकाचे पाऊल उचलले आणि गळफास घेत आपले जीवन संपवले.
खिशात आढळल्या चार चिट्ठ्या,
या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचांसमक्ष मृतदेहाचा पंचनामा केला. पंचनाम्यादरम्यान मृत सुरज याच्या खिशात तब्बल चार चिठ्ठ्या आढळून आल्या. या चिठ्ठ्यांमधील मजकुराच्या आधारे पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलीस पुढील तपास करीत आहेत,
या प्रकरणी मृत तरुणाची आई शशिकला रामभाऊ तेजनकर (वय ६०, रा. अंढेरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात संशयित सतीश रामेश्वर काकडे आणि पत्नी वंदना सुरज तेजनकर यांच्याविरुद्ध कायमी गुन्हा क्रमांक २४१/२०२६, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यातील कलम १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत.
दोषीवर कार्यवाही होणे गरजेची,
कौटुंबिक मतभेद आणि वैवाहिक आयुष्यातील वाद विकोपाला गेल्यास नातेसंबंधांमध्ये संवाद संपतो, ज्याचे पर्यवसान अशा अत्यंत अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटनांमध्ये होते. न्यायालयीन व कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना आत्मघाती पाऊल उचलणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय असू शकत नाही. प्रशासनाने आणि पोलिसांनी अशा संवेदनशील प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.


Post a Comment
0 Comments