आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
बीड: शहरालगतच्या शिवदरा परिसरातील एका शेतात अझात महिलेचे अर्धवट अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेंन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, नेमकी घटना कशी घडली याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, परिसरातील माहिती तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू असून, मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Post a Comment
0 Comments