आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
परभणी : निसर्गाने प्रत्येक सजीवाला स्वत:चं रुप आणि वेगळेपण दिलंय. निसर्गकृपेने माणसांना बुद्धी दिली असून बुद्धीच्या जोरावर माणूस अवकाश पादाक्रांत करत आहेत. तर, पशू, पक्ष्यांनाही विशेष ओळख दिली आहे. गाय, म्हैस हे दूध देणारे पशू म्हणून त्यांना पाळीव प्राणी समजून सांभाळले जाते. त्यासोबतच,शेळी (Goat) देखील दूध देते. मात्र, शेळी प्रजातीमधील मेल अनिमल असलेल्या बोकडानेच चक्क दूध दिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातून ही दुर्मिळ आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. येथे चक्क नर उस्मानाबादी बोकडाने दूध दिल्याने शेळीपालकही आश्चर्यचकित झाला आहे. आता, याबाबत पशूवैद्यकीय तज्ज्ञांनी आपली भूमिका मांडली.
गंगाखेड तालुक्यातील गोंडगाव येथे एक नर उस्मानाबादी बोकड दररोज अर्धा ते पाऊण लिटर दूध देत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
अत्यंत दुर्मिळ घटना,
गंगाखेड तालुक्यातील गोंडगाव येथे एक नर उस्मानाबादी बोकड दररोज अर्धा ते पाऊण लिटर दूध देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील गोंडगाव येथील शेतकरी गोविंद कुकडे यांच्या शेतातील उस्मानाबादी जातीचा नर बोकड गेल्या काही काळापासून नियमित दूध देत असल्याचे निदर्शनास आले आहे. सामान्यतः दूध देण्याची क्षमता मादी प्राण्यांमध्ये असते. त्यामुळे, नर बोकडाकडून दूध मिळणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.
संप्रेरकाच्या बदलामुळे स्थिती निर्माण,
पशुवैद्यक व पशुविज्ञान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शरीरातील काही संप्रेरकांमध्ये झालेल्या बदलांमुळे अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. प्रत्येक नर जनावरांना अविकसित स्तनांचा भाग असतो परंतु त्यांना स्त्रीलिंगी ओजसरस जर चाऱ्यामधून मिळाला तर या भागाचा विकास होऊन त्यावर सुजही येते आणि त्यात दूध तयार होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे, त्यांचा विकसित झालेला पान्हा पिळला की त्यातून दूध येतं, या अगोदरही अशा प्रकारची उदाहरणे समोर आली आहेत. बोकडाचे हे दूध ही सामान्य शेळीच्या दूधाप्रमाणेच असते. परंतु, नरांकडून दुधाची अपेक्षा नसल्याने ते दूध काढू नये आणि वापरात ही घेवू नये अशी माहिती परभणीच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ नितीन मार्कंडेय यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे

Post a Comment
0 Comments