Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ मलकापूर पांग्रा येथे स्वयंसपूर्तीने कडकडीत बंद,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


ता. प्रतिनिधी : गणेश चव्हाण,

सिंदखेडराजा: दिल्ली येथे जंतर मंतर वर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंसपूर्तीने बंद ठेवून कडकडीत बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.




आज सकाळपासूनच बस स्टँड परिसरात असलेले व्यापाऱ्यांनी आणि हॉटेल मालकांनी आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला.  त्यामुळे गावात, रस्त्यावर शुकशुकाटाचे वातावरण दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला गेला.


यावेळी गावातील नागरिक व कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र जमले. विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध व्यक्त करत लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि हुकूमशाहीविरोधात शांततापूर्ण पद्धतीने आवाज उठविण्यात आला.या बंदमध्ये गावातील नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संपूर्ण बंद शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडला


Post a Comment

0 Comments

Top Post Ad