आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक:
मूर्तिजापूर: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात वंचित बहुजन आघाडी या पक्षाने बंदची हाक दिल्याप्रमाणे आज सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. मात्र काही वेळापूर्वी मूर्तिजापूर शहरात राडा पाहायला मिळाला आहे.
Neet पेपरफुटी प्रकरणामुळे दिल्ली येथील जंतर मंतर वर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्तिजापूर येथील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंसपूर्तीने बंद ठेवून कडकडीत बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा दर्शवत असतानाच तेथील एका दुकानदाराने आपले दुकान बंद राहणार नाही असे म्हटल्यानंतर कार्यकर्ते व दुकानदारामध्ये बाचबाची झाली.आणि दुकानदाराने युवकाला मारहाण केली. त्यामुळे मूर्तिजापूर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पोपोलीस स्टेशन समोर पोहचलेले आहेत.
सध्यातरी वंचितचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडलेला आहे. पुढे काय घडणार काहीवेळानंतर कळेल तोपर्यंत सर्व त्या विषयाकडे नजर लावून आहेत.



Post a Comment
0 Comments