आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
मेहकर: तालुक्यातील परतापूर येथे २७ जून रोजी अवैध गर्भलिंग निदान करताना एक बोगस डॉक्टरला पीसीपीएनडीटीच्या पथकाने रंगेहात पकडले. ज्याच्या घरात गर्भलिंग निदान करण्यात आले. त्या घरमालकासह डॉक्टरविरुद्ध मेहकर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. मात्र, पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल न झाल्याने जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, ३ जुलै रोजी आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी कायद्यानुसार चार्जशीट दाखल केली आहे. आता आरोपींविरुद्ध अवैध गर्भलिंग निदानचा खटला चालविला जाणार आहे.
परतापूर येथील अमोल रमेश रसाळ याच्या घरी २७ जून रोजी बोगस डॉक्टर अनिल रामदास सोनुने हा एका महिलेचे सोनोग्राफी मशीनद्वारे अवैध गर्भलिंग निदान करीत होता. दुपारच्या वेळी पीसीपीएनटीडीच्या टीमसह मेहकर पोलिसांनी धाड घातली. डॉक्टर म्हणविणारा अनिल सोनुने याच्यासह घरमालकास पकडण्यात आले. मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे यांनी मेहकर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. दोन्ही आरोपींविरुद्ध
या प्रकरणी आरोग्य विभागाने अवैध गर्भलिंग निदान अॅक्टनुसार २९ जून रोजी पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व पंचांचे जबाब नोंदवून ३ जुलै रोजी न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली. दोन्ही आरोपींविरुद्ध पीसीपीएनडीटी अॅक्टनुसार खटला चालणार आहे.
adv. वंदना काकडे (तायडे), आरोग्य विभाग सल्लागार सीएस काय म्हणतात,
अवैध गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये ज्या महिलेचे गर्भलिंग निदान केले, त्या महिलेसोबत असलेली तिची सासू व महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे का, याविषयी माहिती विचारली असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार म्हणाले, हा आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. पोलीस चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू शकतात, असे बिराजदार म्हणाले.
आम्ही याप्रकरणी न्यायालयाला अर्ज देऊन विनंती केली की अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी पोलिसामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, जेणेकरून गर्भलिंग निदान करण्यासाठी जी मशीन वापरल्या गेली, ती कुठून आणल्या गेली होती. तसेच यात आणखी काही आरोपी आहेत का याचा सुद्धा तपास लागेल.
डॉ. सुनीता हिवसे, वैद्यकीय अधीक्षक, मेहकर,

Post a Comment
0 Comments